Friday, September 24, 2010

धर्मशिक्षण

पितृपक्ष विशेष
श्राद्धविधीचा इतिहास
अ. 'श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रुढ आचार आजही सुरू आहे.
आ.    मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात.'
इ.    लक्ष्मण आणि जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो अन् त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो, असा उल्लेख रामायणात आहे.
इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था आणि सांप्रत काळातील अवस्था
 अ.    अग्नौकरण : ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे.
आ.    पिंडदान (पिंडपूजा) : यजुर्वेद, ब्राह्म� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts