Thursday, September 30, 2010

हिमायत बेगला न्यायालयीन कोठडी

पुणे येथील बाँबस्फोटाचे प्रकरण
     पुणे, २९ सप्टेंबर - येथील जर्मन बेकरीत झालेल्या बाँबस्फोटाचा आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. महत्त्वाचे साक्षीदार सापडले असून त्यांच्यासमोर बेगचे ओळखसंचलन करण्यात येणार आहे.
    अतिरेकीविरोधी पथकाने बेगच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्याला न्यायालयासमोर उपस्थित केले. पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित राखत, त्याला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती साहाय्यक पोलीस आयुक्त विनोद सातव आणि साहाय्यक शासकीय अधिवक्ता ए.व्ही. औसेकर यांनी न्यायालयास केली. या गुन्ह्याच्या अन्वेषणातील आरोपींच्या संदर्भात महत्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. त्यांच्याकडून बेगचे ओळखसंचलन घेण्यात येणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एस्. बोस यांनी � [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts