Wednesday, September 29, 2010

रामजन्मभूमीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाला छावणीचे स्वरूप

* देशभर अतीदक्षता * ६ राज्ये अतीसंवेदनशील घोषित
    लखनौ, २९ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - तब्बल ६ दशके रखडलेल्या रामजन्मभूमीच्या खटल्याच्या निकालाकडे अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. विविध राज्यांत तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांमुळे देशाला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे.
    हा खटला पुढे ढकलण्याची त्रिपाठी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली, तसेच या खटल्याचा निकाल घोषित करावा, असा आदेशही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाला दिला होता. त्यानुसार खंडपिठाकडून उद्या दुपारी निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशभर अतीदक्षतेची चेतावणी दिली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये २ लक्ष पोलीस तैनात!
     उद्याच्या निकालासाठी एकट्या उत्तरप्रदेश राज्यामध्ये तब्बल २ [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts