Saturday, October 2, 2010

जय श्रीराम .... भारतात खरं राम राज्य येऊ दे

काल लखनौ खंडपीठाने अयोध्येतील राम जन्मभूमिबद्दल निर्णय दिला व गेल्या ६० वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न तूर्तास तरी निकाली निघाला (तूर्तास ह्या करिता कि हिंदू महासभेने व वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा मानस जाहीर केला आहे). काल निर्णय जाहीर झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार न झाल्याने सरकार / पोलिस व सामान्य जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असेल. संघाकडून व बी जे पी कडून अतिशय संयमित प्रतिक्रियेने वातावरणातील तणाव निवळण्यास मदतच झाली आणि आम्ही सामान्य जन त्याचे स्वागतच करतो. हा प्रश्न निकाली निघाल्याने भारत देशात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल अशी आशा करुया. शांततेच वातावरण असेल तरच खरं "राम राज्य" निर्माण होईल, यात काही शंका नाही. आता हा प्रश्न संपल्याने राज्यकर्ते / विरोधी पक्ष / सामान्य जन विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष देतील अशी आपण श्री र� [...]

No comments:

Post a Comment

LinkWithin

Popular Posts